परंडा-कारंजा येथील पूरपरिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; बोटीतून केला पाहणी दौरा.
परंडा(तानाजी घोडके ) परंडा तालुक्यातील कारंजा आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीची पाहणी आज दि.२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) बोटीमधून प्रवास करत त्यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण…