परंडा तालुक्यातील भारत गॅस एजन्सीच्या ग्राहकांकडून सर्व्हे पावतीवरील रकमेत खाडाखोड;कथित लुटीविरोधात ग्राहकांची तक्रार

परंडा (प्रतिनिधी): तालुक्यात भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस (LPG) एजन्सीमार्फत राबवल्या जाणाऱ्या सुरक्षितता तपासणी (Safety Survey) मोहिमेत ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सर्व्हेच्या अधिकृत पावतीवर असलेल्या मूळ रक्कमेवर खाडाखोड करून ग्राहकांकडून जादा पैसे उकळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीमार्फत घरोघरी जाऊन गॅस जोडणीची…

अधिक बातमी वाचा...

कुंभेफळ येथे हजरत गैबी इस्माईल बाबांचा संदल मोठ्या उत्साहात संपन्न

परंडा (प्रतिनिधी): कुभेफळ येथील ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या हजरत गैबी इस्माईल बाबा यांचा वार्षिक संदल सोहळा  दि- १६ जानेवारी रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवासाठी कुंभेफळसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच दर्गा परिसरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळी संदल कमिटीच्या वतीने बाबांच्या मजारवर पवित्र ‘गिलाफ’ अर्पण करण्यात आला. दुपारी…

अधिक बातमी वाचा...

महानगरपालिका निवडणूकीत मोठे दैदिप्यमान यश मिळवून भाजपा पक्ष अव्वल ठरला; परंडा विजय उत्सव साजरा…

परंडा:- जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातात महानगरपालिका निवडणूकीत मोठे दैदिप्यमान यश मिळवून भाजपा पक्ष अव्वल ठरला आहे. भारतीय जनता पार्टी च्या या अभुतपुर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे मोठा जल्लोष साजरा केला. भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी उपस्थित सर्वांना पेढा भरवत…

अधिक बातमी वाचा...

परंडा-ग्रामसेवक गेला कुण्या गावा ; तलाठ्यांचा नाही कसा ठावा !

परंडा(प्रतिनिधी) शेतकरी वर्गात तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने तीव्र नाराजी पसरली आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांची कामे, जसे की सातबारा काढणे, विविध दाखले मिळवणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे, यात मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि वेळेवर मदत मिळत नाही, परिणामी विकास खुंटतो परंडा तालुक्यातील गांव कामगार तलाठी…

अधिक बातमी वाचा...

आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही

धाराशिव-(प्रतिनिधी)शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.13 जानेवारी रोजी पार पडली. या बठकीत आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव शहरातील पापनास नगर येथे पारधी वस्तीस मूलभूत सोयीसुविधा व वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आयोजित…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे संविधान अमृत महोत्सवानिमित्त  देशभक्ती पर गीते सादर करण्यात आली.

परंडा :दि.१३(माझं गांव माझं शहर) शासनाच्या आदेशानुसार बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी संविधान जनजागृती करण्यासाठी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले. देशभक्ती गीतांच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत प्रभावी संदेश देण्यात…

अधिक बातमी वाचा...

मकर संक्रांती निमित्त सुगडसह विविध साहित्य खरेदीला महिलांची गर्दी..

परंडा(प्रतिनिधी) शहरात मकरसंक्रातीनिमित्त आठवडा बाजारात वाणाच्या सामानाच्या व्यापाऱ्यानी दुकाने थाटली असून, बाजार फुलून गेला. तर सुगडसह विविध साहित्य खरेदीला महिलांनी गर्दी केली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांचा सण असलेला मकरसंक्रातीला वाणाचे साहित्य तसेच कुंभार बांधवांनी तयार केलेले सुगड, बोळके आदींची खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करत आहेत. भाजीपालाही चढ्या दराने विकत घ्यावा लागत आहे. मकरसंक्रातीच्या सणाला…

अधिक बातमी वाचा...

परंडा प.स. नुतन गटविकास अधिकारी विनोद जाधव  यांचा माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेतर्फे सत्त्कार…

परंडा(माझं गांव माझं शहर) पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारी म्हणून विनोद जाधव यांच्याकडे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परांडा यांच्याकडून सत्कार करण्यात आला .    यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख. तालुका अध्यक्ष कानिफनाथ सरपणे.महिला तालुकाध्यक्ष अश्विनी मगर. फारुख मुलानी. जमीर शिकलकर. भाऊ…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय परंडा जि.धाराशिव येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.

परंडा(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून श्री. नारायण खैरे सर, प्राचार्य,बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय,परंडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचा समन्वय कसा आवश्यक आहे, अभ्यासातील सातत्य,शिस्त, मूल्यशिक्षण व पालकांची भूमिका यावर श्री.खैरे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास मान्यवर…

अधिक बातमी वाचा...

अनाळा येथे किशोरवयीन मुली व महिला जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन प्रशिक्षण संपन्न..

अनाळा (प्रतिनिधी)एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प परंडा अतिरिक्त पदभार अनाळा येथे किशोरवयीन मुली व महिला जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन प्रशिक्षण दि . ०९ रोजी घेण्यात आले. या प्रशिक्षणाला आसू विभागाच्या अंगणवाडी पर्येंवेक्षिका जे. ए .मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित किशोरी मुली व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अनाळा चे वैद्यकिय अधिकारी डॉ…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगर परिषद जनशक्ती नगर विकास आघाडीच्या मुख्य प्रतोद पदी रमेशसिंह परदेशी यांची एकमताने निवड..!

परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या ‘जनशक्ती नगर विकास आघाडी’ च्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा नुकताच परंडा येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने परंड्यातील राजकीय वातावरण उत्साहाने न्हाऊन निघाले होते. या सत्कार समारंभास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच…

अधिक बातमी वाचा...

भाजपा कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार

परंडा(प्रतिनिधी) मराठी पत्रकार दिनानिमित्त परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन ‘मराठी पत्रकार दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री‌. संतोष सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नगरसेवक श्री. रमेशसिंह परदेशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. श्री. जहीर चौधरी, तालुका सरचिटणीस श्री. तानाजी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!