शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न

परंडा(प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती परंडा सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न झाला. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यातून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात परंडा पंचायत समिती गणातून श्री. वशिष माणिक जंतकर, जिल्हा परिषद गणातून सौ. किसकिंदा बाबासाहेब देशमुख, तसेच खासापुरी पंचायत समिती गणातून सौ. कल्पना बुद्धीवान गोडगे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख श्री. रणजीत पाटील ,गावातील कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व मतदार उपस्थित होते. दादांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला अधिक बळ मिळाले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या मेळाव्यात उमेदवारांनी स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित व युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मतदारांनी ‘मशाल’ या चिन्हास पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
सर्व मतदारांनी ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!