परंडा शहरात संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा.

परंडा, (प्रतिनिधी ) संतकृपा ही जीवनातील सर्वात मोठी कृपा असते.थोर संत हे कल्पतरुप्रमाणे असतात.मनुष्य जीवनाला योग्य दिशा देऊन त्याला उत्तम दशेला प्राप्त करुन देण्यासाठी संतानी महान कार्य केले आहे.प्रगटदिन सोहळा साजरा करुन संतानी दिलेली शिकवण सर्वानी आपल्या आचरणात आणावी असे मत हभप धर्मराज दादा महाराज सामनगांवकर यांनी व्यक्त केले.

शहरात विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त रविवार ( ता.८) रोजी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.शहरातील महाराष्ट्र चँपियन पै.आप्पा काशीद यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हभप धर्मराजदादा सामनगावकर,शिवसेना शिंदेगट जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंखे, नुतन उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकुर, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघन, कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी,उद्योजक काकासाहेब साळुंखे,अशोक वेताळ, देवानंद टकले,हभप बालाजी बोराडे, जेष्ठ पञकार सुशीलकुमार शुक्ला,पञकार आनंद खर्डेकर,व्हाईस ऑफ मीडियाचे ता. कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक,सुवर्णकार संघटनेचे मनोज चिंतामणी,विशाल देवकर, माऊली गोडगे, नागनाथ सुर्यवंशी,सलीम सय्यद, बाशाभाई शहाबर्फीवाले, संजय कोळगे, गणेश राशनकर, तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सुरेश घाडगे, समीर पठाण, बाळासाहेब पाटील, शशीकांत जाधव,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे,नाभिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नागेश काशीद,आदिसह शहरातील राजकीय, सामाजीक, शैक्षणिक क्षेञातील नागरीक उपस्थित होते.

यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच शहरातील कुर्डुवाडी मार्गावर,असलेल्या स्व. दयाशंकर तिवारी यांनी स्वखर्चातुन शेतात बांधलेल्या संत गजानन महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. गजानन महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त पहाटे श्रीस अभिषेक करण्यात आला.दुपारी बारा वाजता ,श्री वर गुलाल पुष्प उधळण्यात आले.यावेळी,नागरीक, महिला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.शहारातील मंगळवार पेठेत निवृत्त क्रिडाशिक्षक शिवाजीराव कदम यांच्या निवासस्थानी संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी श्रीचे दर्शन घेतले.

error: Content is protected !!