धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘वंचित बहुजन आघाडी ’चे चूल मांडून आंदोलन

धाराशिव,दि.६(माझं गांव माझं शहर) धाराशिव येथे गॅस तुटवडा व दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चूल मांडून आंदोलन करण्यात आले.राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांविषयी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
‘नरेंद्र,कब मिलेगा सिलेंडर’ या घोषणांद्वारे आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. गॅस टंचाईमुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या असून चहाच्या टपऱ्या व रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स बंद पडल्याचे चित्र आहे.अनेकांना कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून गुजराण करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दि.११ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला इशारा आज खरा ठरत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबे,हॉटेल व्यवसाय,चहाच्या टपऱ्या,फूड स्टॉल्स,केटरिंग व्यवसाय तसेच एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगांवर या टंचाईचा मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.यावेळी निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना महिलांनी चुलीवर केलेली भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा भेट देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे,युवा आघाडीचे शितल चव्हाण,कामगार आघाडीचे सुधीर वाघमारे,फुले-आंबेडकर विद्वत सभेचे डॉ.अनंत देडगे,भारतीय बौद्ध महासभेचे विजय बनसोडे,गुणवंत सोनवणे,धनंजय वाघमारे,महासचिव नासीर शेख,उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे,महादेव ऐडके,रुस्तम पठाण,प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे,कृष्णा शिनगारे,सुनिल वाघमारे,शेखर बनसोडे,विकास बनसोडे,राहुल पोरे,किरण बनसोडे,इरशाद बागवान, तानाजी सोनवणे, बी.डी.शिंदे,मिलिंद रोकडे,जीवन कदम,रामभाऊ गायकवाड,गोविंद भंडारे,विद्याताई वाघमारे,मंगलताई आव्हाड, सुरेखाताई गंगावणे,बाबासाहेब वाघमारे, मिलिंद वाघमारे,गौतम गायकवाड,सचिन राठोड,मुस्तफा फकीर,किरण गायकवाड, नंदकुमार हवळे,सचिन गायकवाड,आनंद गाडे,अशोक कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!