परंडा(माझं गावं माझं शहर) शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांना नुकतीच भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी पदवी प्रदान केली आहे. दि. 4 मार्च 2026 रोजी त्यांचा भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने तोंडी मुलाखत (परीक्षा) घेतली होती.
त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालकांना येणाऱ्या समस्यांचा सर्वेक्षणात्मक अभ्यास या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. त्यांना शारीरिक शिक्षण महाविद्यालय भारतीय विद्यापीठ पुणे येथील प्राचार्य डॉ स्वप्नील विधाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी डीन डॉ प्रदीप देशमुख तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी येथील विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुरेश लांडगे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. त्यांना शिक्षणातील उच्च पदवी प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते शाल फेटा व बुके देऊन महाविद्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय (बप्पा) निंबाळकर संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे यांच्या सह प्रा किरण देशमुख यांच्या मित्र परिवारांनी अभिनंदन व कौतुक केले. या सत्कार समारंभा प्रसंगी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे डॉ अतुल हुंबे डॉ प्रकाश सरवदे डॉ विद्याधर नलवडे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख डॉ संभाजी गाते डॉ अक्षय घुमरे डॉ बाळासाहेब राऊत डॉ दीपक तोडकरी डॉ विशाल जाधव डॉ सचिन चव्हाण डॉ कृष्णा परभणे डॉ सचिन साबळे प्रा जगन्नाथ माळी यांच्यासह कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा किरण देशमुख यांनी सत्काराला उतार देताना सांगितले की माझ्या संशोधन काळामध्ये मला ज्या ज्या मित्रांनी सहकार्य केले त्यांचा मी कायम ऋणी राहीन. मी कनिष्ठ विभागामध्ये काम करत असताना सुद्धा शिक्षणाची आवड असल्याने व माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते की मी डॉक्टर व्हावा व ते स्वप्न आज मी पूर्ण केले आहे. यावेळी प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी प्राध्यापक डॉक्टर किरण देशमुख यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .