परंडा पोलिसांची मोठी कारवाई ( एम.डी पावडर ) अमली पदार्थ विकणारा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद!

परंडा(माझं गांव माझं शहर) पोलीस ठाणे परंडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस ठाणे परंडा यांना दि.28/02/2026 रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा एम.डी. पावडर (अंमली पदार्थ) घेवुन मुंगशी कडुन परंडा शहराकडे येत आहे अशी बाबती मिळाले वरुन पोलीस निरीक्षक चोरमले सोबत पोलीस उप निरिक्षक श्री. बी.आर. खरात, पो.हे.कॉ. 1224 शिंदे, पो.हे.कॉ. 1303 गुंडाळे, पो.हे.कॉ. 1475 राउत, पो.कॉ. 1175 अडसुळ, पो.कॉ. 1851 सगर, चालक पो. कॉ.475 सरगर, चालक पो.कॉ. 509 शेख, दोन शासकीय पंच, शासकीय वाहनाने पोलीस ठाणे परंडा येथुन रवाना होवुन दि.28/02/2026 रोजी 17.00 वा. सुमारास परंडा ते मुंगशी जाणारा रोडवर परंडा शिवारातील गफार मुजावर यांचे शेताजवळ मुंगशी गावाकडुन परंडा शहराकडे येणा-या मोटार सायकल नंबर एम.व्ही.बी. 7181 यावरील इसमास मोटार सायकल थांबविण्याचा इशारा केला असता तो मोटार सायकल थांबवत नसल्याचे निर्देशनास येताच त्याची मोटार सायकल आडवुन त्यास मोटार सायकलचे खाली उतरुन त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी नवनाथ सोनवणे वय 45 वर्ष, रा. गारभवानी इंदीरा नगर झोपडप‌ट्टी परंडा असे सांगीतले. तेव्हा त्यास मिळालेल्या गोपनिय बातमी बाबत कळवुन त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता शर्ट च्या खिशा मध्ये अंमली पदार्थ एम. डीपावडर 14 ग्रॅम 510 मिली एकुण 20 पुड्या किंमत आंदाजे 2,17,650 रुपये पॉलिथीनच्या लहान पिशव्यामध्ये मिळुन आली. व गुन्हयात वापरलेली वरील नमुद मोटार सायकल जुनी वापरती किंमत 15000 रुपये असा एकुण 2,32,6050 रुपचे मुद्देमाल आरोपी नामे बालाजी नवनाथ सोनवणे रा. परंडा याचे कब्जात मिळून आला.
सदरची कारवाई मा. श्रीमती रितु खोखर पोलीस अधीक्षक धाराशिव, मा.श्रीमती शफकत आमना अपर पोलीस अधीक्षक धाराशिव, मा.श्री अनिल चोरमले साहेब उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग भुम यांचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे परंडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, आसाराम चोरमले, पोलीस उप निरीक्षक खरात, पो.ह.1224 शिंदे, पो.हे. कॉ. 1475 राउत, पो.हे.कॉ.13403 गुंडाळे, पो.कॉ. 1175 अडसुळ, पो.कॉ. 1851 सगर, चालक पो.कॉ.475 सरगर, चालक पो.कॉ. 509 शेख यांनी केली आहे. पो.हे.कॉ.1303 नितीण गुंडाळे यांचे तकारी वरुन गुन्हा रजि.नंबर 105/2026 कलम 8 (क), 21 (ब) गुंगीकारक औषदी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास सध्या पोलीस उप निरीक्षक बी. आर. खरात करीत आहे.

error: Content is protected !!