संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकू दे आमदार तानाजी सावंत यांचे भैरवनाथाकडे साकडे.

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा भूम वाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दि ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने डोंजा जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नारळ फोडून भैरवनाथाकडे साकडे घालत प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी शिवसेना पक्षाचे डोंजा गटाचे उमेदवार अविदाबाई जगताप तसेच पंचायत समिती गणातील शिवसेना पक्षाचे उमेदवार शशीकांत पाटील समाधान नलवडे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता आण्णा साळुंके, उमेदवाराचे प्रतिनिधी नवनाथ आप्पा जगताप, परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर आरपीआयचे संजय बनसोडे, नगरसेवक वाजीद दखनी, संजय घाडगे, सचिन सोनारीकर उपस्थित होते. यावेळी आमदार सावंत यांच्या हस्ते भैरवनाथ मंदिरात पुजाऱ्याच्या उपस्थित भैरवनाथाची आरती करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी प्रथम आमदार तानाजीराव सावंत यांचे सोनारी नगरीत वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले.

तर जनतेचा ही,मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित मतदारांशी आ. सावंत यांनी संवाद साधत सांगितले की आपण भैरवनाथाकडे साकडे घातले आहे व मागणं केलं फक्त एका डोंजा गटासाठी नाही फक्त माझ्या भूम – परंडा – वाशी साठी नाही तर जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकू दे आणि या जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर माझ्या धनुष्यबाणाचे राज्य येऊ दे, माझ्या जनतेचे जीवन सुखदायक होऊ दे, एक संधी, माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या प्रतिनिधीला निवडून दे अशा प्रकारचे साकडे भैरवनाकडे आमदार तानाजीराव सावंत यांनी घातले .

पुढे बोलताना सावंत म्हणाले धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो जर कोणी मतभेद करीत असेल त्याला खड्यासारखा बाजूला करा त्याची औकात दाखवा . ज्या -ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या पुढचे बटन दाबून माझ्या उमेदवाराला विजयी करा . आज तुम्हाला हे आवहान करतो असे म्हणत माझ्या पक्षाशी धनुष्यबाणाशी इणि माझ्या भगव्याची जर प्रतारणा कोणी करणार असेल तर त्याला माझ्या सर्व जनतेला नम्र कळकळीची आवहान आहे की, त्याला खड्यासारखे बाजूला करा . ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेवरती भगवा फडकलेला दिसेल असेही सावंत म्हणाले.

error: Content is protected !!