परंडा, दि. १४ जून २०२६ – परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक कै. इंदुबाई भगवान देशमाने यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी ४ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ९ वाजता बावची रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीप्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. इंदुबाई देशमाने यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या परंडा येथील व्यापारी सोपान देशमाने व तात्या देशमाने यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनाने देशमाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शतायुषी आयुष्य लाभलेल्या इंदुबाई देशमाने यांनी आपल्या प्रेमळ व साध्या स्वभावामुळे समाजात आदराचे स्थान मिळविले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹🙏
