बावची विद्यालय, परंडा येथे ‘घर घर संविधान’ रथ यात्रेचे उत्साहात स्वागत

परंडा : दि.२३(प्रतिनिधी) रोजी बावची विद्यालय, परंडा येथे महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित ‘घर घर संविधान ’ रथ यात्रेचे प्रार्थनेच्या वेळी उत्साहात आगमन झाले.

विद्यालयात रथ यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी रथासोबत आलेल्या कलाकारांनी प्रभावी व संदेशपूर्ण पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमादरम्यान विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची व संविधानाचे पालन करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे विद्यालय परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

error: Content is protected !!