बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न


परंडा (माझं गांव माझं शहर) बावाची विद्यालय, परंडा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या भावनांना स्पर्श करणारा आणि मार्गदर्शनाने समृद्ध असा हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री बिभिषण रोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री निलेश काकडे साहेब, डॉ. महेंद्र सुदाम कदम सर (लेखक-साहित्यिक तथा प्राचार्य विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी), नगराध्यक्ष श्री जाकीरभाई सौदागर, श्री दत्ता (आण्णा) साळुंके, श्री संजयकुमार बनसोडे (प्रदेश सरचिटणीस, आर.पी.आय.), प्रा. डॉ. विजय काळे सर, सौ. अनिता रोडगे मॅडम (माजी मुख्याध्यापिका), श्री हनुमंत रोडगे (माजी सरपंच, बावची) दिनकर (आबा) खैरे मा. सरपंच पाचपिंपळा, धनाजी खैरे (अनाळा सर्कल प्रमुख), दत्ता महाराज रणभोर, पै. राहुल भांडवलकर, शंकर पाटील, सतिश भांडवलकर, तुकाराम मारकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नारायण खैरे यांनी केले. यावेळी डॉ.महेंद्र कदम सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत जीवनात ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत करण्याचा सल्ला दिला. व विद्यार्थ्यांना आजी कुटूंबाच आगळ या पाठविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार श्री निलेश काकडे साहेब, श्री दत्ता (आण्णा) साळुंके आणि श्री संजयकुमार बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आजच्या स्वयं शासन दिनाचे मुख्याध्यापक कु आदित्य हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक कु प्रतिक परमेश्वर सूर्यवंशी, आणि शिक्षणाधिकारी कु ज्योतीरादित्य रविंद्र शिंदे हे उपस्थित होते. या समारंभात इयत्ता १० वीचे विद्यार्थी श्रेया पाटील, जान्हवी पाटील, यशराज हुके, शिवानी लिमकर आणि अमरनाथ होरे यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेतील आठवणी आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास वाघमारे व श्री संजय वलेकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री शुभम रोडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!