माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा तालुका हा आकांक्षीत तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना व उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील योजनांचा आणि उपक्रमांचा आढावा व पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाने भेट दिली. भेटी दरम्यान आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना आणि शिराळा येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इ. ठिकाणी भेटी देण्यात आल्या. पथक प्रमुख मुग्धा नारकर मॅडम मा. गटविकास अधिकारी(BDO ) विनोद जाधव साहेब, मा. बाल विकास अधिकारी गणेश कुकडे साहेब, मा. तालुका आरोग्य अधिकारी निभोरकर साहेब, मा. विस्तार अधिकारी श्री. कुटे साहेब, CM फेलो श्री. निरंजन माने, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक तुकाराम ढोरे आणि गावातील कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका इ. उपस्थित होते.