📰 परंडा तालुक्यात वाढत्या लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा संताप; महावितरण कार्यालयात धडक

परंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पाणीपुरवठा व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठत प्रशासनाशी थेट चर्चा केली. या वेळी उपस्थित…

अधिक बातमी वाचा...

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 प्रारंभ

परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार..

माझं गांव माझं शहर, दि.२८(प्रतिनिधी)धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी श्री. भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या..यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जेष्ठ विधीज्ञ श्री. दादासाहेब खरसडे, श्री. डॉ. दशरथ घोगरे, श्री. अंकुश मुळीक सर,…

अधिक बातमी वाचा...

परंडा-असंख्य कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश..

परंडा(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तसेच पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री. धनंजय दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री. जयदेव गोफणे, श्री. महादेव वळेकर, श्री. योगेश राऊत, श्री. नानासाहेब कातुरे, श्री. अशोक राऊत, श्री. बंडु…

अधिक बातमी वाचा...

आमदार तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या वतीने पुणे येथे सत्कार.

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम–परांडा–वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे त्यांचा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन शाल घालून त्यांचा सन्मान केला. आमदार तानाजीराव सावंत यांनी राज्याच्या तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कामांची दखल…

अधिक बातमी वाचा...

करोडो खर्चून उभं केलेलं मेडिकल कॉलेज; पण रुग्णांना सोलापूरला धाडायचं? — मनोज जाधव यांचा संतप्त सवाल

धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे. मनोज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी धाराशिव वैद्यकीय…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे जाहीर आवाहन

धाराशिव : विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालय धाराशिवच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग…

अधिक बातमी वाचा...

कुभेफळ ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर; कामात भ्रष्टाचार केल्याने सरपंच आणि ग्रामसेवकाला ६८ हजार रुपये भरण्याचे आदेश .

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील मौजे कुभेफळ येथे ग्रामपंचायतीच्या विकासकामांत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत कुभेफळ येथील सरपंच आणि ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विकासकामे पूर्ण न करता ६८,२०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गट विकास अधिकारी (BDO) विनोद जाधव यांनी कडक पावले उचलली असून संबंधित रक्कम १५ दिवसांच्या आत शासकीय खात्यात जमा…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव, कळंब, तुळजापूरवर फुलले ‘कमळ’ ; जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

​धाराशिव (माझं गांव माझं शहर) जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी विजय मिळवला असून, या विजयामुळे जिल्ह्यात आमदार पाटील यांची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे….

अधिक बातमी वाचा...

परंडा पंचायत समितीच्या सभापती पदी अर्चना जाधव यांची निवड ; उपसभापती पदी गवारे

परंडा :परंडा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम दि. ०६ रोजी पार पडला यावेळी सकाळी सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव यांनी व राष्ट्रवादी काँगेसच्या मोनिका पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे परशू…

अधिक बातमी वाचा...

मिटर रिडींग उपलब्ध नाही – महावितरणचा अजब कारभार!

परंडा : परंडा तालुक्यातील नागरिकांना वीज बिलाबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मिटर रिडींग न घेता अंदाजे बिल देण्यात येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. “मिटर रिडींग उपलब्ध नाही” असा उल्लेख बिलावर दिसत असूनही रक्कम आकारली जात आहे. त्यामध्ये सद्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा चालू आहेत महावितरणाचा लाईट येण्या जाण्याचा लपंडाव…

अधिक बातमी वाचा...

राज्य शासनाचे लिपिक संवर्गांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष -पाचव्या दिवशीही काम बंद आंदोलन..

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) परंडा महाराष्ट्र शासनाच्या ४२६ विभागांतील प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या लिपीक संवर्गांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ‘जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटने’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील आठवड्यापासून टप्याटप्याने सुरू असलेल्या असहकार आंदोलनानंतरही शासनाने दखल न घेतल्याने २३ फेब्रुवारीपासून परंडा पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपूर्ण काम बंद आंदोलन पुकारले…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!