++

जिल्ह्यातील प्रथमच परंडा येथे मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र.

परंडा (प्रतिनिधी)- मराठवाड्यात अनेक तालीम संघ आहेत परंतु सोनारी येथील जि.प.धाराशिवचे माजी सभापती भैरवनाथ तालीम संघ व पै.नवनाथ आप्पा जगताप स्पोर्टस् फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. नवनाथ जगताप यांनी राजश्री छत्रपती शाहूराजे यांचा वारसा सांभाळत तालीम संघाची स्थापना करून महाराष्ट्राभर गाजत असलेले मल्ल तयार करण्याचे काम अनेक वर्षापासून करत आले आहेत. आधूनिक काळात मॅटवरील कुस्तीचे आखाडे…

अधिक बातमी वाचा...
Image editor output image987243829 1752065207889

धाराशिव:- नगरपालिका प्रशासनाचे बेजबाबदार धोरण : पथदिव्यांच्या पोलवर अनधिकृत सांगड्यांचे साम्राज्य.

धाराशिव दि.9 जुलै (प्रतिनिधी): धाराशिव शहराच्या सौंदर्यावर घाला घालणारे, नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आणि कायदा व नियमांची पायमल्ली करणारे तेरणा कॉलेज ते आयुर्वेदिक कॉलेज मधे रस्त्याच्या मधोमध असलेल्या दिवायडर मधील पथदिव्यांच्या पोलवरील अनधिकृत सांगडे आणि बॅनर्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोणाच्या परवानगीने हे सांगडे लावले जात आहेत, याचा थांगपत्ता लागलेला नसला, तरी ‘कुणाच्या…

अधिक बातमी वाचा...

कल्याणसागर बँकेच्या चेअरमनपदी डॉ. मंदार पंडित तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र चौधरी

परंडा(प्रतिनिधी):- परंडा येथील कल्याणसागर अर्बन को-ॲापरेटिव्ह बॅंकेच्या चेअरमनपदी डॅा. श्री. मंदार वसंतराव पंडित तर व्हाईस चेअरमनपदी श्री. राजेंद्र मोहन चौधरी यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बी. एच. सावतर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अविरोध निवड करण्यात आली.  कल्याणसागर अर्बन को-ॲापरेटिव्ह बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बुधवार दि. ९ जुलै रोजी झालेल्या  बैठकीत ही निवड झाली. या निवडी नंतर…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटली; जबाबदार कोण?

परंडा(तानाजी घोडके ) :- तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक शाळेच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वरचेवर ओस पडू लागल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे त्याच गावात राहतात, असे सांगून घरभाडे उचलतात.’शासनाची फसवणूक करून आर्थिक लूट केली जात आहे. परंडा तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर प्राथमिक शाळा आहेत. पण या शाळांतील पटसंख्या…

अधिक बातमी वाचा...

कंत्राटदार, बेरोजगार अभियंता, मजूर संस्थांची 89 हजार कोटींची देयके रखडली

धाराशिव -(प्रतिनिधी) राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, हॉट मिक्सधारक कंत्राटदार, मजुर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत. ही देयके तातडीने देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी मागणीचे निवेदन देण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

कळंब(प्रतिनिधी) पत्रकारांच्या कल्याणासाठी झगडत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्कार समारंभात पत्रकारांच्या पाल्यांना एकुण ३० कीटचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय पाटील दुधगावकर जि प माजी अध्यक्ष धाराशिव, हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पवार पोलीस उपविभागीय अधिकारी…

अधिक बातमी वाचा...

परंडा पालखी सोहळ्याचे महत्त्व: २० हजार वारकऱ्यांचे एकत्र आगमन

परंडा(तानाजी घोडके) पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (दि.२९) सायं. ६ वाजता परंडा येथे आगमन होताच परंडा वासियांनी भव्य स्वागत केले. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, वातावरणात आनंद आणि भक्तीचा उत्साह पसरला. श्रींची पालखी येणार असल्याने पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, ज्यामुळे धार्मिक उत्सवाची…

अधिक बातमी वाचा...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये अनेक तरुणांना संधी – संजय गुरव

परंडा(प्रतिनिधी)संपूर्ण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी व बेकार तरुणांना उपयुक्त कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांचा व नियोक्त्यांचा सहकार्यासह रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परंडा येथील दि. 30 रोजी आयोजित रोजगार मेळाव्यास विशेष महत्त्व होते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव व शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

error: Content is protected !!