परंडा शहरात पाणीपुरवठा विस्कळीत; ‘लाईट नाही किंवा मोटर जळली’ या कारणांनी नागरिक हैराण .
परंडा (प्रतिनिधी): कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच परंडा शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून (विशेषतः डिसेंबर २०२५ मधील निवडणुकांनंतर) शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यंत अनियमित झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.कर्मचाऱ्यांची तीच तीच कारणे:शहरातील पाणीपुरवठा का होत नाही, याबाबत जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली जाते, तेव्हा “लाईट नव्हती”, “मोटर जळली आहे”…
