परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी “आनंद बाजार” या मार्केट डे उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञानाची जाणीव निर्माण व्हावी तसेच उद्योजकतेची आवड विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बिभिषण रोडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण सिरसट (सहाय्यक पोलीस निरीक्षक, परंडा), श्री सूर्यवंशी साहेब, श्री प्रफुल्ल गोडगे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती परंडा), तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा बनसोडे उपस्थित होत्या. यावेळी बबलू जिनेरी, बाबा बहिरे, हाफिजद्दीन करपुडे हे प्रसिद्ध व्यापारी तसेच पालक श्री सुदाम पाटील, श्री विनोद पाटील, अंगद नलवडे, सचिन मोरे, आबा जगताप, नेमीनाथ मोरे, सुनिल पाटील, पारसराम कोळी, दत्ता नेटके, बालाजी मिस्कीन, आरिफ डोंगरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद बाजारात शेकडो विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक दुकाने थाटली होती. खाद्यपदार्थ, खेळणी, शैक्षणिक साहित्य, हस्तकला वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशांचे व्यवस्थापन, ग्राहकांशी संवादकौशल्य तसेच संघभावना यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
स्पर्धेत मोरे अथर्व सचिन यांनी प्रथम, सुरवसे अनुष्का गणेश यांनी द्वितीय तर सूर्यवंशी प्रणव व बुरंगे राघव अनंतराव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आजच्या आनंद बाजारात तब्ब्ल 1,76,960 रुपयांची उलाढाल झाली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बावची विद्यालयाचे प्राचार्य श्री नारायण खैरे यांनी केले. सूत्रसंचालन संजय वलेकर यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन शुभम रोडगे यांनी केले.