दहिटणा (ता. परंडा) येथे महावितरणची नव्याने उभारलेली वीजवाहिनी कोसळल्याच्या गंभीर घटनेची भाजपा युवा मोर्चा परंडाने दखल घेत महावितरण प्रशासनाला निवेदन दिले आहे.
नव्याने उभारलेली वीजवाहिनी अल्पावधीतच कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी शेतकरी व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
भाजपा युवा मोर्चाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे, दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, संपूर्ण वीजवाहिनीची तांत्रिक तपासणी करून अहवाल जाहीर करावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
“नव्याने उभारलेली वीजवाहिनी अल्पावधीतच कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शेतकरी व नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नये. दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.”
— अजित काकडे-पाटील
तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा परंडा
दहिटणा येथे नव्याने उभारलेली वीजवाहिनी कोसळली; संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी
