बावची विद्यालय, परंडा येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन.

परंडा(तानाजी घोडके)  शहरातील बावची विद्यालय, परंडा येथे दि.२२ रोजी प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांची जयंती म्हणजेच जागतिक गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गणितीय मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा. श्री बिभिषण रोडगे सर यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री नारायण खैरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन गणित शिक्षक श्री सचिन मोरे, श्री प्रमोद डोके, श्री संदीप अनभुले, गरड मॅडम व फासे मॅडम यांनी केले.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी गणितातील विविध संकल्पना मॉडेल्सच्या माध्यमातून प्रभावीरीत्या सादर केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेली त्रिमितीय आकृती, भूमितीशी संबंधित नमुने व गणिती सूत्रांचे प्रत्यक्ष उपयोग पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले

error: Content is protected !!