राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी नर्सरी, एलकेजी, युकेजी व इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे शाळेच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी सजावट, स्वागत कार्यक्रम आणि आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी, आत्मीयता व उत्सुकता निर्माण झाली.

यावेळी विद्यार्थ्यांना पेन्सिलचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शाळेला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

या प्रवेशोत्सवामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी, प्रेरणादायी व संस्मरणीय वातावरणात झाली. राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा परिवाराने सर्व नवागत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!