ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई काशीद यांचे निधन; परंडा शहरात हळहळ

परंडा प्रतिनिधी : परंडा शहरातील काशीद गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई दगडू काशीद यांचे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

त्यांच्या पार्थिवावर बावची रोड येथील स्मशानभूमीत दुपारी १ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सौ. काशीद या महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आप्पा काशीद, राजेंद्र काशीद, महाराष्ट्र चॅम्पियन पोलीस हवालदार राम काशीद, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी तसेच दैनिक सकाळचे परंडा शहर प्रतिनिधी प्रकाश काशीद यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या प्रेमळ, मनमिळावू व कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्या परिसरात सर्वांच्या परिचयाच्या व आदराच्या होत्या.

त्यांच्या निधनाने काशीद परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सामाजिक, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व काशीद परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕯️

error: Content is protected !!