परंडा येथे डिजिटल मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

परंडा |प्रतिनिधी

परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

डिजिटल माध्यमांद्वारे जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. बैठकीत नूरजहाँ शेख यांची सोशल मीडिया अध्यक्षा, संतोष शिंदे यांची उपाध्यक्ष तर धनंजय गोफणे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता संघटनेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि विविध जनहिताच्या विषयांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच डिजिटल पत्रकारितेला अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य फारुख शेख, तानाजी घोडके, रणजीतकुमार शिंदे, रावसाहेब गायकवाड, अमोल निकाळजे, विजय मेहर आणि अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षा नूरजहाँ शेख, उपाध्यक्ष संतोष शिंदे आणि सचिव धनंजय गोफणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या निवडीबद्दल परांडा शहर व तालुक्यातील पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संघटनेच्या कार्याला नवी दिशा व अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!