📰 माझं गांव माझं शहर 📰
📍 परंडा | प्रतिनिधी
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, परंडा कार्यालयामार्फत जन्मनोंद अभिलेखामध्ये नोंद घेण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यानुसार महादेव निवृत्ती गुणवरे (रा. शेळगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांचा जन्म दि. ०१ जानेवारी १९४७ रोजी मौजे शेळगाव येथे झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित जन्मनोंद ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांनी जन्मनोंद अभिलेखामध्ये नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला आहे.
यासंदर्भात कोणासही अर्जदाराच्या जन्मदिनांक अथवा जन्मस्थळाबाबत काही आक्षेप असल्यास, जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, परंडा कार्यालयात लेखी स्वरूपात हरकत व आवश्यक पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निर्धारित मुदतीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
माझं गांव माझं शहर
जनतेचा आवाज, विकासाचा ध्यास 🖋️

You must be logged in to post a comment.