धाराशिव-बीड-लातूर विधानपरिषद मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या;पदाधिकारी यांची वरिष्टांकडे मागणी

🌐 माझं गांव माझं शहर(धाराशिव)
लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये हालचालींना वेग लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात येत आहे.

आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, २४ मे ते १ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) ला मिळावी आणि त्या माध्यमातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांत व्यापक जनसंपर्क असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे बोलले जात आहे. मागील निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे यावेळीही ही जागा पक्षाकडे कायम राहू शकते, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून सक्षम, संघटनात्मक ताकद असलेला आणि जनसंपर्कात आघाडीवर असलेला उमेदवार दिल्यास ही जागा सहज जिंकता येऊ शकते. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याकडे आवश्यक राजकीय अनुभव, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी भावना पक्षांतर्गत व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मजबूत ठेवण्यात डॉ. प्रतापसिंह पाटील यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून सक्षम कार्यकारिणी निर्माण केली. तसेच धाराशिव नगरपालिकेत आठ नगरसेवक निवडून आणण्यातही त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आजही अनेक समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिल्यास ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजय मिळवू शकतात, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!