खरीप २०२६ पूर्वतयारीसाठी रोसा व भोंजा हवेली येथे कृषी आढावा बैठक संपन्न

माझं गांव माझं शहर | तानाजी घोडके : तालुक्यातील मौजे रोसा व भोंजा हवेली येथे आज दि. १४ रोजी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप २०२६ हंगामाच्या पूर्वतयारी अनुषंगाने खरीप आढावा बैठक तसेच नैसर्गिक जैविक शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भोंजा हवेली येथे पाणी फाउंडेशन पिक स्पर्धेअंतर्गत दशपर्णी अर्क तयारीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कृषी विभागाचे निमंत्रक डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी शेतकऱ्यांना निम अर्क तयार करण्याची पद्धत, किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रियेचे महत्त्व, माती परीक्षण अहवालानुसार खत नियोजन तसेच जलतारा उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी एस. के. माळी, उप कृषी अधिकारी बी. एन. हांगे, पंचायत समिती सदस्य अमोल सुभाष नलवडे, सरपंच रविंद्र नलवडे, अमोल जगताप, भाग्यवंत व्ही. एन. यांच्यासह महिला शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!