मुगांव येथे शालेय शिक्षण समितीची बिनविरोध निवड


माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा मुगांव येथे शालेय शिक्षण समितीची निवडणूक नुकतीच शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे या समितीची निवड बिनविरोध करण्यात आली असून ग्रामस्थांनी एकमताने पदाधिकाऱ्यांवर विश्वास दर्शवला आहे.

या निवड प्रक्रियेत समितीच्या अध्यक्षपदी प्राणजीत नवनाथ गवंडी यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी ज्योती अमोल पाटील यांची निवड झाली. सदस्य म्हणून नागनाथ उद्धव गवंडी, पुष्पा नागनाथ शिंदे, कैलास नवनाथ जगताप, रेश्मा लक्ष्मण भागडे, सविता किरण हिवरे, शहाजी भालचंद्र गरदडे आणि अमृता गणेश पुरी यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षणप्रेमी म्हणून विक्रम श्रीरंग जगताप यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला सरपंच राजेंद्र गरदाडे, गणेश पुरी, बबन कोळी, कैलास काळे, नवनाथ भागडे, लक्ष्मण भागडे, अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विटकर सर, डोणजा केंद्र प्रमुख खरात सर, निवड समिती निरीक्षक सरवदे सर व विटकर मॅडम यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

नवीन समितीकडून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी समिती सक्रियपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बिनविरोध निवडीमुळे गावात समाधानाचे वातावरण असून सर्वांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!