धाराशिव जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा बावची विद्यालय,परंडा च्या वतीने सत्कार

परंडा,दि.३(माझं गांव माझं शहर) बावची विद्यालय,परंडा येथे धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव (संलग्न – महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महासंघ) यांच्या वतीने “डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार २०२६” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्रीमती अर्चनाताई पाटील (अध्यक्ष, जि.प. धाराशिव)यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. बिभिषण रोडगे सर, प्राचार्य मा.श्री. नारायण खैरे सर व पुजा रोडगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. दयानंद जटनुरे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव) हे होते. तर
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्रीमती अर्चनाताई जाधव (सभापती, पं. स. परंडा), मा.श्री.अण्णासाहेब जाधव तालुकाध्यक्ष शिवसेना,
मा.रविंद्र जाधव (साहाय्यक गटविकास अधिकारी, पं. स. परंडा), व मा. जाकीरभाई सौदागर (नगराध्यक्ष, न. प. परंडा) मा.श्री.भाऊसाहेब खरसडे सभापती कृषी व पशुसंवर्धन जि. प. धाराशिव) मा.श्री. अमोल जगताप पंचायत समिती सदस्य तथा गट नेते, सौ. वैशालीताई डोके जि.प. सदस्य धाराशिव, मा.श्री. रेवन दादा ढोरे जि.प. सदस्य धाराशिव मा श्री. डॉ. रविंद्र जगताप (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा) मा.श्री.बालाजी इतबारे सर (धाराशिव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ अजित दादा पवार गट), मा.श्री. सुहास वडणे (प्राचार्य सरस्वती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी), मा.श्री.धनंजय हांडे (संचालक बाणगंगा सह साखर कारखाना इडा), मा.श्री. हनुमंत गायकवाड (विधानसभा अध्यक्ष परंडा भूम वाशी मतदार संघ) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विशेष उपस्थितीत मा.श्री. सुभाषभाऊ मोरे संस्थापक माणिकबाबा माध्य व उच्च माध्य विद्यालय शेळगाव, मा.श्री. रवी नरहीरे संस्थापक कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल कळंब, मा.श्री. बिभिषण रोडगे संस्थापक श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ, मा.श्री. संतोष माळी उपशिक्षणाधिकारी योजना जि.प. धाराशिव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र स्वामी सर यांनी केले तर बावची विद्यालयाच्या वतीने प्राचार्य मा श्री.नारायण खैरे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार श्री.संतोष माळीसाहेब यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांनी विज्ञान व शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आणि शिक्षकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव, बावची विद्यालय, परंडा व परंडा तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या वेळी परंडा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष बालासाहेब काळे सर व सर्व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक विज्ञान शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!