परंडा (प्रतिनिधी): श्रीराम नवमी निमित्त परंडा शहरात भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.शहरातील विविध भागातून निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भगवान श्रीरामांच्या प्रतिमेसह आकर्षक सजावट केलेले रथ, ढोल-ताशांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
शोभायात्रेचा मार्ग शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आला होता. मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले. तसेच विविध ठिकाणी पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
या शोभा यात्रेमध्ये भाजपा जेष्ठ नेते मा.आमदार सुजितसिंह ठाकूर , भाजपा युवा नेते मल्हार पाटील , जि.प. सदस्य धनंजय सावंत ,भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे , शहर अध्यक्ष उमाकांत कोरे,संतोष सूर्यवंशी ,उपनगराध्यक्ष समर्जीतसिंह ठाकूर , नगरसेवक अविनाश विधाते ,दिव्यांग संयोजक तानाजी घोडके, निशिकांत क्षीरसागर ,जयदेव गोफणे , गौतम लटके ,अधिसह कार्यकर्ते उप्स्तीत होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शोभायात्रेमुळे शहरात उत्साह आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
You must be logged in to post a comment.