शिवसेना (उबाठा ) गटात भूकंप ; तालूकाध्यक्ष मेघराज पाटील शिवसेना(शिंदे) गटात.

परंडा दि ३१ : – शिवसेना ( उबाठा ) गटात भूकंप . अचानकपणे तालूका प्रमुख मेघराज पाटील यांनी मला तुमच्याशी हितकुज करायचे आहे या टॅगलाईन खाली दि ३१ रोजी शहरातील प्रितम मंगल कार्यालयात बैठक घेतली असता शिवसेना उबाठा पक्षाचे पद आणि सदस्याचा राजीनामा देऊन शेकडो कार्यकत्यासह शिवसेना शिंदे गटात आमदार प्रा डॉ तानजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

या प्रसंगी बोलताना मेघराज पाटील यांनी खंत व्यक्त केली मी स्व . ज्ञानेश्वर पाटील तात्याच्या शब्दाखातर पूर्णवेळ पक्षासाठी वाहून घेतले परंतु सध्या उबाठा गटाने माझा राजकिय बळी घेतला असे सांगितले . मेघराज पाटलांचा शिंदे गटात प्रवेश होताच आमदार डॉ . तानाजीराव सावंत यांनी मेघराज पाटलांना मोठया पदावर घेतले जाईल असा शब्द दिला .

यावेळी शिवसेना नेते दताआणा साळुंके , आरपीआयचे नेते संजयकुमार बनसोडे , पै.नवनाथआप्पा जगताप , पै.विशालनाना देवकर , युवानेते राहूल डोके आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .

error: Content is protected !!