५ वर्षीय जारा शाहरुख मुलानीचा पहिला रोजा; आलेश्वर परिसरात कौतुक!

परंडा (प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवांकडून सध्या कडक उपवास (रोजा) पाळले जात आहेत. कडक ऊन आणि वाढता उन्हाचा तडाखा असतानाही, परंडा तालुक्यातील आलिश्वर येथील अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीने, जारा शाहरुख मुलानी हिने आपला आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
जाराने पहाटे ‘सहेरी’ करून दिवसभर अन्न-पाण्याविना राहून आपला पहिला उपवास पूर्ण केला. सायंकाळी ‘इफ्तार’च्या वेळी तिचे वडील शाहरुख मुलानी व कुटुंबातील सदस्यांनी तिचे पुष्पहार घालून व कौतुक करून अभिनंदन केले.
एकीकडे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामुळे रोजा पाळणे कठीण जात असताना, इतक्या लहान वयात जाराने दाखवलेला संयम आणि श्रद्धेचे आलेश्वर परिसरात मोठे कौतुक होत आहे. तिच्या या धाडसाबद्दल ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

error: Content is protected !!