जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त शंभर टक्के प्रवेश

परंडा | माझं गाव माझं शहर :- परंडा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त “प्रवेश वाढवा” अभियानांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये शंभर टक्के प्रवेश पूर्ण करण्यात आला. या उपक्रमामुळे गावात शैक्षणिक जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांची आकर्षक प्रभात फेरी काढण्यात आली. फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे संदेश दिले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश कुलकर्णी, अंगणवाडी कार्यकर्त्या दमयंती पाटील, मुख्याध्यापक चांदणे सर, उकिरडे सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या या प्रयत्नांमुळे शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचत असून, “प्रवेश वाढवा” अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!