परंडा दि . 10 – जागतिक महिला दिनानिमित्त परंडा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व एलआयसी एच एफ एल प्रकल्प अंतर्गत दि . १० रोजी एमटेक सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला . प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमागोपालन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे व पं .स . कृषी विस्तार अधिकारी सुरज बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमात गणेश कुकडे यांनी स्त्री म्हणजे वात्सल्य , स्त्री म्हणजे मांगल्य , स्त्री म्हणजे मातृत्व , स्त्री म्हणजे कर्तत्व अशा शब्दात महिलांचे कौतुक केले . आपल्या शैक्षणिक जीवनाविषयी मी कसा घडलो याविषयी महिलाना अनमोल मार्गदर्शन करत समाजामध्ये महिलांचे योगदान किती मोठे आहे याविषयी महत्त्व सांगितले . कृषी विस्तार अधिकारी सुरज बोडके यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत क्षितिजाकडे झेप “तू नारी , तू घे भरारी , व्यापून टाक क्षितिजे सारी . या शब्दात आपले मत व्यक्त केले . शासकिय विविध योजनेविषयी त्यांनी माहिती दिली . प्रेमा गोपालन प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका सीमा सय्यद यांनी आयुष्यातील सर्व आव्हानावर मात करणाऱ्या प्रत्येक स्त्री ला मानाचा मुजरा . जगाला एक सुंदर आणि चांगले स्थान बनविणाऱ्या सर्व यशस्वी महिलांना प्रेम , शक्ती व आनंदाच्या शुभेच्छा दिल्या . स्वयम शिक्षण प्रयोग संस्थेच्या शाहेदा मुजावर यांनी तालुक्यात सुरु असलेल्या स्वयंमशिक्षण प्रयोग व एलआयसी प्रकल्प अंतर्गत जैविक शेती विषयी माहिती दिली .या प्रकल्पा अंतर्गत तालुक्यातील पन्नास गावामध्ये काम सुरु असून या गावासाठी १३ महिला काम पाहत आहेत . या महिलांच्या मार्गदर्शना खाली शेतकरी महिलांनी गांडुळखत बेड उभारणी केली आहे . जीवामृत , दशपर्णी अर्क अग्नीअस्त्र तयार करून त्याची फवारणी कशी करावी याची माहिती महिलांना देत असून सेंद्रिय शेती चे महत्व पटवून देत आहेत . रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची ठरत आहे . पन्नास गावामध्ये महिला उत्कृष्ठ काम करत आहेत कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमास स्वयंम शिक्षण प्रयोगच्या प्रशिक्षिका नौशाद अलिम शेख , संघमित्रा अंकुशराव,अश्विनी कदम गावपातळीवरील लिडर अन्नपुर्णा ठोसर , प्रिया हजारे , कामिनी वरपे , सोनाली पाटील , , तनया सुतार , शीला राऊत , आरती चोबे ‘ सीमा कातूरे , विमल सुरवसे ‘ स्वातिका ओहोळ , भाग्यलक्ष्मी भोसले मेघा गायकवाड , पुजा जाधव , यांच्या सह जवळपास 263 महिलांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रोड्युसर कंपनीचे संचालक गणेश नेटके व लिडर आरती चोबे यांनी केले तर आभार स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या शाहेदा मुजावर यांनी केले .
- Home
- State News
- स्वयंम शिक्षण प्रयोग एलआयसी व एच एफ एल यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे महिला मेळावा संपन्न .