वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा;  मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे मुलींसाठी दि. २६ रोजी समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

महाविद्यालयात दर दोन महिन्याला नियमितपणे मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्याच उपक्रमांतर्गत या महिन्याची कार्यशाळा २६ डिसेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी पूजा रोडगे तसेच जाधव , हावळे , यांनी खालील विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले .

1) विद्यार्थिनींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल.
2) Social media व मोबाईलचा अतिवापर.
3) प्रवास करत असताना येणाऱ्या अडचणी .
4) मुलींना येणारा मानसिक ताण तणाव व डिप्रेशन पासून दूर करण्याबाबत.
5) बोर्ड परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीची पूर्वतयारी कशी करावी.
6) वडीलधाऱ्यांशी बोलत असताना संवाद कौशल्य कसे असावे. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयात दर २ महिन्याला ११ वी व १२ वी च्या सर्व मुलींची समुपदेशन कार्यशाळा पार पडत असते. यावेळी मुलींचे विविध प्रश्न, शंका, अडीअडचणी याबाबत प्रश्न विचारून सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले जाते. यावेळी हावळे , जाधव , फासे ,गोडगे , उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!