शासकीय आयटीआय परंडा येथील तीन प्रोजेक्टची जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन करिता निवड.

परंडा(माझं गांव माझं शहर):- आय टी आय म्हणजे सर्वसाधारण घटकापर्यंत पोहचण्याचे योग्य साधन असे प्रतिपादन पंचायत समिती परंडा गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके यांनी परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनात केले.
परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १९ रोजी तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य केशव पवार हे होते तर प्रमुख पाहुणे पंचायत समिती परंडा गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके हे होते. यावेळी संस्थेतील सर्व व्यवसायातील प्रशिक्षणार्थी यांनी तयार केलेले प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते.


औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कौशल्यात भर पडून त्यांच्यात संशोधनात्मक वृती जागी होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी दरवर्षी आशा प्रकारच्या तंत्रप्रदर्षणाचे आयोजन करण्यात येते.


यामध्ये फिटर व्यवसायातून हॅण्ड ड्रिल मशीन, हॅण्ड कॅन कृषर, वेल्डर व्यवसायातून सिलेंडर ट्रॉली, शॉक अब्झॉरबर चेअर, ड्रेस मेकिंग व्यवसायातून प्लाझो सूट, डेकोरेशन बॉक्स, वीजतंत्री व्यवसायातून फॉर्मिंग सिस्टम, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, इलेक्ट्रिक शॉक सिक्युरिटी, न्युक्लिअर पॉवर , ऑटोमॅटिक वॉटर टॅप वॉटर इलेक्ट्रॉनिक व्यवसायातून वॉटर लेवल इंडिकेटर या प्रोजेक्ट चे सादरीकरण करण्यात आले.


पुढे बोलताना त्यांनी सांगितले की प्रशिक्षणार्थी यांनी घेतलेल्या ज्ञान समाजासाठी वापरावे ते ज्ञान समाजपयोगी असणे गरजेचे आहे. तुमचे ज्ञानसमाजाची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पनिदेशक नितेश फाळके यांनी केले तर आभार कल्लेश भोसले यांनी मानले .हा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पनिदेशक रतिकांत पवार, रामेश्वर जाधवर, शुभम पाटील, शिल्पनिदेशिका महानंदा काळे, सुरेखा जाधव, भाग्यश्री मोहरे यांनी परिश्रम घेतले

error: Content is protected !!