परंडा( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आदेशानुसार व मा.दिव्यांग दैवत बच्चुभाऊ कडू व विविध सामाजिक दिव्यांग संघटना यांच्या मागणीनुसार दिव्यांगाना दर महा 2500 रुपये एवढे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ऑक्टोबर 2025 पासून घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये होते त्यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. भूम परंडा वाशी तुळजापूर उमरगा लोहारा धाराशिव कळंब या ठिकाणी तुरळक दिव्यांगणा 2500 रुपये आर्थिक अनुदान खात्यावर जमा झाले आहे. तसेच उर्वरित शेकडो दिव्यांग लाभार्थ्यांना १५०० रुपये अनुदान जमा झाले आहे. हा हलगर्जीपणा कोणाचा याचा लवकरात लवकर शोध घेऊन मा. कलेक्टर साहेब धाराशिव यांनी संबंधित विभागाचे तहसीलदार निलेश काकडे व (संगायो)लवकर कार्यवाही करावी व सर्व गरजू ओरिजिनल दिव्यांगाच्या खात्यावर 2500 रुपये जमा व्हावेत. बोगस दिव्यांग बांधवांची पडताळणी करून केवायसी करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यावर आपण उचित कार्यवाही करू असे समजावून दिव्यांगाना माघारी पाठवले होते तथापि या नोव्हेंबर महिन्यामध्ये दिव्यांगाच्या खात्यावर १५००/- जमा झाले आहेत. त्यामध्ये परंडा तहसील कार्यालयामध्ये अति बोगस दिव्यांग नोंद आहे याची पडताळणी करावी . दिव्यांग केवायसी व माहिती पाठवणे या कामाला प्राधान्य द्यावे दिव्यांगाच्या खात्यावर लवकरात लवकर पगारी 2500 जमा व्हाव्या. अन्यथा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने तहसील कार्यालय येथे दिव्यांग बांधवासोबत उपोषण करण्यात येणार आहे .अशी माहिती दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिली आहे.
- Home
- State News
- परंडा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सावळा गोंधळ; दिव्यांग वाढीव अनुदानापासून वंचित.