प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर):- श्री संत एकनाथ महाराज पैठण यांच्या पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर असा असुन या मार्गावरील रस्याचे काम संथ गतीने चालू असलेल्या मुळे या मार्गावर असलेल्या गावाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे
वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी लाल रंगाची एस टी आज ही लाखो प्रवाशांच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाने एस टी हे सरकारी वाहन सर्व सामान्य प्रवाशांचे हक्काचे वाहन आहे परंतु देवगांव ( बु ), जेकटेवाडी, ताकमोडवाडी, उंडेगांव, चिंचपुर (खु) आदी गावांना येणारी भूम – पुणे, आणि खर्डा- परंडा या बस सेवा पैठण ते पंढरपूर रस्ताचे काम चालू आहे हे कारण देत बंद केली आहे त्यामुळे या गावातील वयोवृद्ध व आजारी रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील एस टी कधी चालू होणार अशा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. सर्व सामान्य नागरिकांतुन बोलले जात आहे. की याच मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या ठराविक गाडया धावतात पण मोठ्या शहराकडे जाणार्या भूम-पुणे आणि खर्डा – परंडा ह्या गाड्या का येऊ शकत नाहीत अशा संतप्त सवाल प्रवाशी करीत आहेत. तरी या मार्गावर असलेल्या बस सेवा एस टी सेवा पुर्ववत करावी अशी मागणी देवगांव( बु ), जेकटेवाडी , ताकमोडवाडी, उंडेगांव, चिंचपुर( खु ) आदी गावांतील नागरिक करीत आहेत.
पैठण ते पंढरपूर हा पालखी मार्ग अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यात
या पालखी मार्गाचे काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आले आहेत पण धाराशिव जिल्ह्यात या मार्गाचे काम संथ गतीने चालू आहे पाच महिन्यानंतर पालखी सोहळा याच मार्गाने जाणार आहे तोपर्यंत तरी रखडलेले परंडा तालुक्यातील रस्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी भाविक भक्तांतुन होत आहे .