आनाळा(प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिम्मीत्त परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला. वारकरी संप्रदाय आणि आषाढी एकादशी चे महत्व समजून घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंदद्विगुणीत करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशीकांत क्षिरसागर व सचिव सौ प्रियंका क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेतील मुलांनी ज्ञानोबा – तुकाराम, ज्ञानोबा – माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी चा जयघोष करीत आनाळा नगरीस ग्रामप्रदक्षणा घातली हा दिंडी सोहळा ग्रामदैवत श्री कालीकादेवी मंदीरापासून सुरू झाला व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकानी समारोप करण्यात आला. या वेळी शाळेतील चिमुकल्यांनी वेगवेगळी वेषभुषा करुण ग्रामस्थांची पालकांची मने जिंकली या वेळी मुलांनी अभंग भजन करत फुगडी हरीनामाच्या गजरात दिंडी सोहळ्या चा समारोप केला समारोपानंतर महालक्ष्मी अलंकार दुकानाचे मालक प्रवीन वेदपाठक व अनिता वेदपाठक यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करण्यात आले. या दिंडी समवेत शाळेचे संस्थापक निशीकांत क्षिरसागर सचिव सौ प्रियंका क्षिरसागर मुख्याध्यापक हनुमंत जगताप उपसस्थित होते दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री घाडगे, शिक्षीका सौ उषा क्षिरसागर सौ करिश्मा शेख, सौ खारतुडे, सौ मैना मोरे, सौ कविता जगताप, ज्योती शिंदे सौ रुतुजा बोंद्रे, कु श्वेता क्षिरसागर, कु प्रतीक्षा वामन, कैलास थोरात, आंबादास गायकवाड, भाऊ हिवरे, बाबासाहेब गायकवाड, बालाजी गरड, औसरे यानी परिश्रम घेतले…