जनसेवेचा आदर्श मा. मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकुर हे होय.

परंडा(माझं गांव माझं शहर ) राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकांच्या समस्यांना समजून घेत त्यांच्या मदतीला अहोरात्र तत्पर राहण्याचा संकल्प आहे. याच संकल्पाचं मूर्तरूप म्हणजे राणाजगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकुर या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.कोणत्याही संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला तत्परतेने धाव येणारे हे दोन्ही नेते खऱ्या अर्थाने जनसेवेचे योद्धे आहेत.

मग तो कोरोना काळ असो, पूरपरिस्थिती असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असोत. प्रत्येक वेळी त्यांनी जमिनीवर उतरून कार्य करत आले आहेत.त्यांची पक्षनिष्ठता आणि सामाजिक बांधिलकी अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. जनतेप्रती असलेला जिव्हाळा यामुळेच असंख्य कार्यकर्ते आजही त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलेले आहेत.

सामान्यतेतून असामान्यतेकडे झालेला त्यांचा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कायम घट्ट ठेवली असून, प्रत्येक व्यक्तीला आपला हक्काचा व जवळचा माणूस वाटतो ही त्यांच वेगळेपण.त्यांच्या माणुसकीची आणि सढळ हाताने केलेल्या सहकार्याची लौकिक राज्यभर पसरली आहे. कोणत्याही समाजघटकाला अडचण आली की, हे दोन्ही नेते पुढाकार घेतात आणि प्रत्यक्ष मदत पुरवतात.

एक कॉल किंवा मेसेजवर तत्काळ प्रतिसाद देणारे, लोकांच्या गरजा समजून घेऊन उपाय शोधणारे, अहोरात्र कार्यरत राहणारे हे नेते म्हणून त्यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे.त्यांचा प्रामाणिकपणा, संयम आणि संवेदनशीलता ही त्यांची खरी ताकद आहे. माणसं जिंकायची असतील तर ती पैशाने नव्हे, तर प्रेमाने आणि संयमाने जिंकायची. हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले आहे.

मा. मंत्री आमदार Ranajagjitsinha Patil साहेब आणि माजी आमदार Sujitsingh Thakur साहेब हे दोघे नेते केवळ पदांनी नव्हे तर जनतेच्या हृदयात कोरलेले लोकनेते आहेत. त्यांच्या कार्यातून राजकारणाला मानवी चेहरा आणि जनसेवेला खरी दिशा मिळाली आहे.

error: Content is protected !!