प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांना परंडा तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे, कृषी अधिकारी श्री मनोज पाटील, AO अधिकारी श्री बिभिषण. हांगे, मंडळ अधिकारी संभाजीराजे माळी, सहायक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, तालुका समन्वयक अमोल पाटील, डायरेक्टर गणेशदादा नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांना रब्बी हंगामातील बियाणे देण्यात आले तसेच सोबत जिवाणू जैविक खत १०० एम एल ची एक बॉटल ॲझोटोबॅक्टर स्पे.+ पीएसबी+केएमबी स्पे. यांच्या मार्फत व श्री पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोडुसर कंपनी लि भोंजा हवेली अंतर्गत व श्री गणेश शेतकरी गट, श्री साई साम्राज्य शेतकरी गट यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक शेंद्रीय शेती साठी बॅरल घेतलेल्या प्रत्येक १०० शेतकऱ्यांना मोफत सी पी पी कल्चर जैविक शेंद्रीय शेती करीता याचा उपयोग फळबाग केळी पेरू सीताफळ पपई इ. पिकांना ड्रिचिंग ड्रीम द्वारे तर रब्बी हंगामातील पिकांना फवारणी करीता देखील उपयोगी असुन याचा उपयोग कुजलेले शेणखत उकीरडा घणकचरा यामध्ये गली करून एक किलो सी पी पी कल्चर १३ लिटर पाण्यात मिसळून गली मध्ये थोडे थोडे टाकावे याची पुर्वतयारी म्हणून आपण एक शेतकऱ्यांना डेमो करून याचा पुरेपुर फायदा होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यावेळी मोठ्या संख्येने युवा शेतकरी लाभार्थी उपस्थित होते.
भोंजा हवेली येथे मोफत रब्बी हंगामातील ज्वारी बियाणे २५ शेतकऱ्यांना वाटप
