परंडा(माझं गांव माझं शहर ) छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा मौजे आसू येथे दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी शुभारंभ. या शिबिरासाठी भूमउपविभागीय अधिकारी मा.रेवया डोंगरे परंडा तहसीलदार निलेश काकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान करण्याच्या उद्देशाने समाधान शिबिर मौजे आसू येथे महालिंगराया मंदिरात आज संपन्न झाले.
या शिबिरामध्ये शासनाच्या नवीन धोरणाबद्दल महसूल विभागाच्या संबंधित सेवा तळागाळापर्यंत लोकापर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावित धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये अकृषी रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे ,सनद प्रणाली संपुष्टात आणणे ,एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्यावतीकरण इत्यादी सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला विद्यार्थी यांना होण्यासाठी वरील नवीन शासन निर्णयाचे मा.तहसीलदार साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले .
या या शिबिरात खालील प्रमाणे सेवा देण्यात आल्या फेरफार शिबिरामध्ये निकाली काढण्यात आलेल्या फेरफार यांची संख्या 20 सातबारा दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या 17 उपलब्ध करून देण्यात आलेले डिजिटल सातबारा यांची संख्या 52 उपलब्ध करून देण्यात आलेले आठ अ उताऱ्यांची संख्या 17 जात प्रमाणपत्र सात रहिवासी प्रमाणपत्र पाच उत्पन्न प्रमाणपत्र नऊ नॉन क्रिमीलेयर तीन वैवाहिक राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र दोन अल्पभूधारक प्रमाणपत्र एक अशी एकूण 27 प्रमाणपत्रांचा लाभ आज शिबिरामध्ये प्रत्यक्ष जागेवरच देण्यात आला.
यामध्ये फेरफार साठी 15 व सातबारा दुरुस्तीसाठी 17 नवीन अर्ज स्वीकारण्यात आले तसेच एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत इमोजणी तीन पीएम किसान निरंक व तक्रार निवारण कक्ष आठ तक्रारींचे जागेवरच लोकांना नवीन कायद्या बाबत वर्ग 2चे 1करणेमार्गदर्शन करण्यात आले ,कमी जास्त पत्रक दोन दोन गावांमध्ये फेरफार घेऊन महसूल दप्तरांचे अद्यावतीकरण करण्यात आले इतर लाभ इतर लाभांमध्ये शिधापत्रिका 11 , सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी श्रावण बाळ,लाभार्थींचे मंजुरी आदेश मा. उपविभागीय अधिकारी डोंगरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आयुष्यमान कार्ड 21 रेशन कार्ड दुरुस्ती 22 पानंद व रस्ते प्रकरणात सहा अर्ज नवीन व भारतीय डाक विमा योजना लाभ आठ पोस्टाच्या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ या ठिकाणी पोस्ट विभागामार्फत देण्यात आला तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वाटप 43 केवायसी 22 एस टी महामंडळाचे नवीन सवलतीचे कार्ड 52 विद्युत वितरण संदर्भात एक अर्ज नैसर्गिक आपत्ती अनुदान तपासणी 22 रस्ता प्रकरणे पाच वर्ग दोनची एक व ग्रामपंचायती संदर्भात एक व फेरफार संदर्भात तीन अर्ज आलेले आहेत.
अशा स्वरुपात समाधान शिबिर सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत लोकांनी भरभरून सहभाग नोंदवून शिबीर यशस्वी केले या शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सुरवसे ए बी ग्राम महसूल अधिकारी शिंदे साहेब कोकाटे शिंदे वाळके खंबायत मॅडम तसेच मा.नायब तहसीलदार बाडकर ,मा.नायब तहसीलदार पूजा गोरे मॅडम ,महा-ई-सेवा केंद्र चालक आसू सरपंच,ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले.
You must be logged in to post a comment.