परंडा तालुक्यातील शिक्षण विभागात मोठी खळबळ ; प्रभारी गटशिक्षणाधिकारी अडचणीत..!

परंडा दि. १ नोव्हेंबर(प्रतिनिधी) परंडा गटशिक्षण कार्यालयात गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या कथित ‘काळा बाजार आणि नियमबाह्य कारभारावर अखेर प्रकाशझोत पडला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी एस.बी. हाके यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला असून, त्यांनी ‘सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण न करता शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे वेतनवाढीचा आर्थिक लाभ घेतल्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सामाजिक न्याय…

अधिक बातमी वाचा...

राष्ट्रीय एकता दिवस ; लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती परंडा येथे साजरी.

परंडा(माझं गांव माझं शहर )राष्ट्रीय एकता दिवस व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त मा. रितु खोखर , पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. शफकत आमना , अपर पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. अनिल चोरमले , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व भा. आसाराम चोरमले, पोलीस निरिक्षक पो.स्टे परंडा यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे…

अधिक बातमी वाचा...

परंडा गटशिक्षण कार्यालयात शिपाई ते क्लार्क झालेले महानवर यांची वाढली ‘अरेरावी’ ;खातेनिहाय चौकशी करा.

परंडा दि.३० (प्रतिनिधी) – परंडा येथील गटशिक्षण कार्यालय, येथे कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक आप्पा महानवार यांच्या सततच्या गैरवर्तना व बेफिकीर कामकाजाच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ता जीवन सुरेश खंडागळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जीवन खंडागळे यांनी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आप्पा महानवार…

अधिक बातमी वाचा...
BARSHI MURUD

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूम (प्रतिनिधी )मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे….

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर नगरपालिका निवडणूक: भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याचे ओमराजे निंबाळकरांचे आवाहन.

तुळजापूर (प्रतिनिधी) आगामी काळात येऊ घातलेल्या तुळजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीने (मविआ) ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास…

अधिक बातमी वाचा...

सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव:(प्रतिनिधी) राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापाऱ्यांकडून केवळ ३,००० ते ३,५०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र ग्रामिण बँक स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न .

अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१७ परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात दि . १६ रोजी संपन्न झाला . अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एकमेव शाखा आहे . ही शाखा गेल्या अनेक वर्षापासून अनाळा येथील ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या इमारतीमध्ये चालू होती . या इमारतीमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेचा उमेदवार म्हणून हरीचंद्र ( बापू ) मिस्कीन यांची जोरदार मागणी.

परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील डोंजा सिनाकोळेगाव धरण क्षेत्रातील विकास कामांपासून ते ग्रामपातळीवरील जनतेच्या अडीअडचणींपर्यंत नेहमीच सक्रिय राहून लोकसेवेची परंपरा जपणारे हरीचंद्र (बापू ) महादेवराव मिस्कीन हे नाव आज डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोळेगाव-सिना धरणाच्यावेळी त्यांचे वडील महादेव आप्पा मिस्कीन सरपंच पदावर असताना त्यांनी धरणग्रस्त गावांचे पुनर्वसन, सोयीसुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत…

अधिक बातमी वाचा...

मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार शिवाजीराव पाटील पुरग्रस्त गावातील दिव्यांगाच्या मदतीला आले धाऊन ..

परंडा (दि१५ ऑक्टोंबर)परंडा तालुक्यातील पुरग्रस्त वागेगव्हाण,नालगाव,लोणी येशील दिव्यांगांना दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके व संस्थेच्या सचिव सोनाली घोडके यांच्या हस्ते जिवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करूनदिव्यांगाना मदतीचा हात दिला आहे. परंडा तालुक्यातील महापूराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या दिव्यांगाच्या पाठीशी दिव्यांगउद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहिली आसून तहसीलदार निलेश काकडे यांच्या सहकार्याने व…

अधिक बातमी वाचा...

लोकसेवा माझ्यासाठी राजकारणाचा मार्ग नाही, तर जीवनाचा श्वास आहे-दिनेश मांगले

परांडा (प्रतिनिधी) दि.१४ – तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये काल राजकारणाच्या रंगमंचावर एक असा निर्णय घडला, की ज्याने प्रत्येक कार्यकर्त्याचे, मतदाराचे आणि सामान्य जनतेचे मन भारावून गेले. जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष घोषित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एकाच नावाकडे लागलं होतं – जनतेचा विश्वासू चेहरा दिनेश रोहिदास मांगले. परंतु सर्वांना धक्का देणारा आणि त्याचवेळी अंतःकरण पिळवटून…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी संपन्न- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे ३ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये ५१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर शेतकरी आत्महत्या: अणदूरमधील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!