बावची विद्यालय परंडा जि.धाराशिव येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.

परंडा(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून श्री. नारायण खैरे सर, प्राचार्य,बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय,परंडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचा समन्वय कसा आवश्यक आहे, अभ्यासातील सातत्य,शिस्त, मूल्यशिक्षण व पालकांची भूमिका यावर श्री.खैरे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास मान्यवर…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची- सचिव तुकाराम मुंढे

पुणे, दि. ७: दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित व संशोधनाधारित समावेशक शिक्षण देण्याची सामूहिक बांधिलकी महत्त्वाची असून याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी केले. नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डीफ (एनसीईडी) महाराष्ट्र व अली यावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने…

अधिक बातमी वाचा...

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा..

परंडा(तानाजी घोडके)  व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने मंगळवार ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र तांबे जिल्हा सदस्य अलीम शेख परंडा तालुका अध्यक्ष मुजीब काझी कार्यध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके मार्गदर्शक पत्रकार श्रीराम विद्वत,पत्रकार फारुक शेख, राहुल शिंदे,गोरख देशमाने,…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करा – सचिव तुकाराम मुंढे

मुंबई, दि. ०५: दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी…

अधिक बातमी वाचा...

देवगांव (बु )जिल्हा परिषद शाळेमध्ये बालिका दिन व बाल आनंद बाजार मेळावा.

देवगांव (रावसाहेब काळे) परंडा तालुक्यातील देवगांव (बु ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि:3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिनाच्या रूपाने साजरी करण्यात आली. व यावेळी शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे देखील खूप सुंदर असे नियोजन करुन मुलांनी शाळेमध्ये बाजार पेठ थाटली होती. सुरवातीला प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतमीचे पूजन सर्व महिला…

अधिक बातमी वाचा...

वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा;  मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे मुलींसाठी दि. २६ रोजी समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. महाविद्यालयात दर दोन महिन्याला नियमितपणे मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्याच उपक्रमांतर्गत या महिन्याची कार्यशाळा २६ डिसेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी पूजा रोडगे तसेच जाधव , हावळे , यांनी खालील विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन…

अधिक बातमी वाचा...

नगराध्यक्ष नेहाताई काकडे व नगरसेवकांचा परंडा येथे सत्कार

परंडा:- धाराशिव नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. नेहाताई राहुल काकडे या विक्रमी मताधिक्याने आणि त्यांचे पती व निर्वाचित नगरसेवक भाजपा युवा मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. राहुल काकडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांसह परंडा येथे भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली.नगराध्यक्ष सौ. नेहाताई काकडे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ….

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन.

परंडा(तानाजी घोडके)  शहरातील बावची विद्यालय, परंडा येथे दि.२२ रोजी प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांची जयंती म्हणजेच जागतिक गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गणितीय मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा. श्री बिभिषण रोडगे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवच्या रुग्णालयास मिळणार नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा ‘मॉडेल टच’; अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी ऐतिहासिक पाऊल

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय तसेच ५०० खाटांचे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही संस्थांमध्ये नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर अद्ययावत व अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी अनमोल…

अधिक बातमी वाचा...

‘व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; राज्यभरातून शेकडो पत्रकार, पदाधिकारी सहभागी.

नागपूर : राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक आणि रेडिओ या पत्रकार यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेटियमवर जोरदार आंदोलन, उपोषण सुरू करण्यात आले आहे. पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी येथे करण्यात आली आहे. राज्यभरातील पत्रकारांनी…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील- सोनारी,डोंजा, देऊळगाव येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य;सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

परंडा : परंडा ते सोनारी मार्गावरील सोनारी गावाजवळ शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रोड उखडून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच हा रस्ता चढाचा असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना तर येथून वाहन नेणे म्हणजे मोठे कठीण ठरत आहे. तसेच डोंजा येथील पारेवाडी चढावर…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपालिका वगळता ; तहसील कार्यालय, गटशिक्षण कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

परंडा (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालय येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधवांच्या समवेत तहसील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी संजय गांधी विभाग प्रमुख नायब तहसीलदार सौ. पूजा गोरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व, दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.  परंडा तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम,वाढीव दिव्यांग अनुदान यासंदर्भात माहिती सांगितली. तहसील कार्यालय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!