दिवाळी सणानिमित्त जादा बस फेऱ्या कराव्यात भाजपा परंडा च्या वतीने मागणी…

परंडा: परंडा तालुक्यातील बहुतांश लोक पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणी कामानिमित्त स्थाईक झाले असून दिवाळी सणानिमित्त सर्व तालुक्यातील रहिवासी असलेले लोक गावी येत आहेत. परंतु बार्शी व कुर्डुवाडी येथुन दु. १२.०० च्या नंतर दोन्ही ठिकाणांवरुन प्रवाशांना येण्यासाठी खूप उशीराने बस सोडण्यात येते. ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशी संख्या खूप जास्त असल्याने परंडा तालुक्यातील प्रवाशांना परंडा तसेच…

अधिक बातमी वाचा...

देवगाव (बु) येथील वाघीणगड निवासस्थानी सुरू असलेले उपोषण स्थगित- मांगले

परंडा दि. १८ (तानाजी घोडके) राजकारणाच्या रंगमंचावर कधी कधी असे क्षण येतात, जे फक्त एका उमेदवाराचा निर्णय नसतो, तर तो लोकभावनेचा, मूल्यांचा आणि नात्यांचा आरसा ठरतो. अशाच एका क्षणाचा साक्षीदार ठरला परंडा-शेळगाव सर्कल!    जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष म्हणून घोषित झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष एकाच नावावर थांबले होते  दिनेश रोहिदास मांगले. यांची प्रामाणिकतेची…

अधिक बातमी वाचा...

आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

परंडा (प्रतिनिधी) आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने शेतीसह सर्वच उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.समाजातील…

अधिक बातमी वाचा...

खर्डा ग्रामस्थांचा माणुसकीचा हात; तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते ‘दिवाळी फराळ किट’चे वाटप

परंडा (माझं गांव माझं शहर) : (दि. १५ ऑक्टोबर) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परंडा तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या घरात अंधार दाटला असताना, खर्डा येथील ग्रामस्थांनी ‘आपुलकीचा शेजारी धर्म’ जपून या पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘आपुलकीचा फराळ’ या उपक्रमांतर्गत खर्डा व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले फराळाचे बॉक्स परंडा…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा, शिपाईच निघाला मास्टरमाइंड

धाराशिव, १४ ऑक्टोबर २०२५: तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांच्याोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे हाच या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली असून,…

अधिक बातमी वाचा...

‘येसूबाई’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी चरणी शेतकऱ्यांसाठी घातले साकडे.

तुळजापूर (प्रतिनिधी) ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आईच्या चरणी कळकळीची प्रार्थना केली. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि जमिनीचे मोठे…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडला घरात पाणी शिरले शेतीचे नुकसान झाले अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.यावेळी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

धाराशिव(माझं गांव माझं शहर)धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदाच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. ही घोषणा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. मृणाल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या सूचनेनुसार, सदस्य पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (ड्रॉ लॉट्स) काढण्यात येणार आहे. हा…

अधिक बातमी वाचा...

महानगरपालिका दिव्यांगांना घरकुल देत नसल्याने दिव्यांगांनी थेट धरला आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला !

जालना (प्रतिनिधी) दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदने दोन वेळेस अमरन उपोषण करूनही महानगरपालिका जाग येत नसल्याने दिवेंगांनी थेट आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला धरलाय शासकीय बंगल्यावरती ठाय्या आंदोलन करत असताना आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले की महानगरपालिकेत या तिथं सविस्तर चर्चा करतो इथं येऊ नका दिव्यांगानी महानगरपालिकेत…

अधिक बातमी वाचा...

सरन्याधीस गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर याच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करा – आरपीआयची मागणी .

परंडा :(माझं गांव माझं शहर) देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करुन त्याच्यावर देशद्रोही खटला दाखल करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआय (ए) च्या वतीने परंड येथे आंदोलन करून निवदेन देण्यात आले . यावेळी संजय कुमार बनसोडे यांच्या नेतत्रत्वात मोर्चा काढण्यात आला…

अधिक बातमी वाचा...

“मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे भव्य प्रकाशन मराठी आत्मभान जागवणारे चिंतनशील लेखन : शुभम मुळे यांचे नवतेक पुस्तक रसिकांसमोर

पुणे(माझं गांव माझं शहर) दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. या संमेलनात युवा लेखक शुभम मुळे यांच्या विचारप्रवर्तक “मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. या…

अधिक बातमी वाचा...

प्रशासकीय राजवटीनंतर धाराशिव नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित!

धाराशिव:(प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यामध्ये धाराशिव नगरपालिकेचे अध्यक्षपद ‘इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे तब्बल तीन वर्षांपासून थांबलेल्या राजकीय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!