‘ईद ए मिलाद’निमित्त शहरातून भव्य जुलूस मिरवणूक || परंड्यात पैगंबर जयंती उत्साहात साजरी !

परंडा(माझं गांव माझं शहर) मुस्लीम धर्माचे संस्थापक महमंद पैगंबर यांची जयंती ‘ईद ए मिलाद’ शहरात मोठ्या श्रद्धेने उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून सकाळी ९ वाजता मुख्य मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान जागोजागी लहान मुलांसाठी शरबत व खाऊचे वाटप करण्यात आले. सकाळी परंडा येथील…

अधिक बातमी वाचा...

शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात पार पडली.

परंडा-शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि.५ ) चार वाजता शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आली भव्य दिव्य मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळन करण्यात आली. शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या मानाच्या गणपती महाआरती उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, विश्वजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आली…

अधिक बातमी वाचा...

आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने मराठा समाज बांधवाकडून मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार

परंडा (माझं गांव माझं शहर) शहरातील जय भवानी गणेश मंडळ आगरकर गल्ली येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देत ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकारचे प्रतिनिधी या नात्याने भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा आगरकर गल्ली…

अधिक बातमी वाचा...

जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव । जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समितीची बैठक संपन्न

धाराशिव दि.३(प्रतिनिधी) धाराशिव येथील नियोजन भवनातील सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार श्री. कैलास पाटील, आमदार श्री. प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनांक घोष तसेच दिशासमिती सदस्य सौ. शामलताई वडने व सौ. कांचन ताई संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान संबंधित…

अधिक बातमी वाचा...

ईद ए मिलादुन्नबी निमित्त कुंभेफळ येथे जरांगे पाटील समर्थक यांचा मुस्लीम बांधवाकडून सत्कार.

परंडा (माझं गांव माझं शहर)परंडा तालुक्यात कुंभेफळ येथे ईद-ए-मिलादुश्वी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळा ते कोठुळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्या नेण्यात आली. गफूरशा बाबा यांना चादर चढवून फाटक करण्यात आली. खात्याखाली संपल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले ईद ए…

अधिक बातमी वाचा...

कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला- दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव(प्रतिनिधी)कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा करून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. त्यानंतर झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले असून, त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग सेस जि. प. धाराशिव अंतर्गत अर्ज सादर करण्याचे आव्हान -दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके.

परंडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या स्वसंपादीत उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत पुढील योजना राबविण्यात येत आहेत.मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य वअतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक सहाय्य या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील पूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी,पंचायत समिती सर्व यांच्यामार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी,समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात सात्वंन भेटी देऊन त्यांच्या कुटुंबास धिर दिला – खा. ओमराजे निंबाळकर

परंडा(माझ गाव माझ शहर ) परंडा शहरातील शिवसेना जिल्हा प्रमुख मा. दत्ता आण्णा सांळूके यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते, तसेच अजहर भाई शेख यांच्या आत्याचे दुःखद निधन झाले होते व शफीभाई मुजावर यांच्या मुलाचे दुःखद निधन झाले होते यांच्या सर्वाच्या घरी जाऊन खासदार ओमराजे निंबाळकर व मा. जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी…

अधिक बातमी वाचा...

मनसेच्या निवेदनाची दखल; कुंभेफळ पाझर तलाव शंभर टक्के भरला

परंडा(माझं गांव माझं शहर) साकत मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वेस्टेज पाणी जात असल्याने ते कुंभेफळ पाझर तलावात सोडावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 15 दिवसांपूर्वी शाखा अधिकारी जलसिंचन शाखा क्र.15 जलसिंचन विभाग परांडा यांच्याकडे करण्यात आली होती. या निवेदनाची तात्काळ दखल घेत जलसिंचन विभागाचे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी बिट प्रमुख बाबुराव तनपुरे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून…

अधिक बातमी वाचा...

परंडा-शहरातील मानाच्या हंसराज गणेश मंडळाची श्री ची आरती सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने करण्यात आली.

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाची स्थापना सन १९६६ साली हिंदु मुस्लीम  तरुणानी जातीय सलोखा कायम रहावा यासाठी एकत्रितपणे येऊन गणेश मंडळाची स्थापना केली.गणेश मंडळाने गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली.मंडळाचा वसा पुढे चालु ठेवण्यात आला त्यासाठी तरुणानी पुढाकार घेऊन मंडळाच्या कार्यकारीनी मध्ये उपाध्यक्ष तसेच सदस्य पदी मुस्लीम समाजातील तरुणांना…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान: एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही – खा. ओमराजे निंबाळकर

तुळजापूर(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील सावरगाव आणि परिसरातील गावांमध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की,…

अधिक बातमी वाचा...

कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

कळंब,२९( माझं गांव माझं शहर) कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलने आपल्या परंपरेला साजेसा असा एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. आज स्टेट लेव्हल ज्युनिअर आयएएस स्पर्धेत उत्तम यश संपादन केलेल्या कॅनव्हास शाळेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला श्री. हेमंत ढोकळे, तहसीलदार कळंब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत फुलांच्या गुच्छांनी करण्यात…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!