झाडावरून व प्रवेशद्वारावर बसलेले आंदोलक खाली आले; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीला मान

धाराशिव(प्रतिनिधी) मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला, जेव्हा काही माता-भगिनींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाडावर व प्रवेशद्वारावर चढून आंदोलन सुरू ठेवले. याची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आंदोलक महिलांशी संवाद साधला. त्यांनी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करत झाडावरून…

अधिक बातमी वाचा...

बार्शी तालुक्यातील शालेय वाहतूक वाहनांची तातडीने तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

बार्शी(प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस आणि वाहनांमध्ये महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल बस नियम २०११ चे पालन होत नसल्याच्या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) तात्काळ तपासणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बार्शीतील तक्रारदार यांनी १२ ऑगस्ट २०२५…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव येथील शेतकरी आंदोलन चिघळले; जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंदोलक उपोषणावर ठाम

धाराशिव: येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळले आहे. आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसून, आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आंदोलक अमोल जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी संपन्न- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे ३ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये ५१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव पूरस्थिती: एकही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची ग्वाही

धाराशिव, दि. १(माझं गांव माझं शहर) : जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत कोणताही बाधित शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून पारदर्शक पद्धतीने मदतकार्य राबवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या महापुरामुळे…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे डी बी ए समूहच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

परंडा दि.०२(प्रतिनिधी) येथील विश्रामगृह परंडा येथे डी बी ए समूहच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी डीबीए समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे ,ॲड. दयानंद धेंडे, बौद्धचार्य महावीर बनसोडे, युवा नेते भारत धेंडे , मंजुषा सुरवसे राजनंदिनी धेंडे, आरती बनसोडे,शोभा बनसोडे , यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर शेतकरी आत्महत्या: अणदूरमधील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात…

अधिक बातमी वाचा...

भाजपच्या वतीने देवगाव येथील पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप..

परंडा:- महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. संजय (बाळा) भेगडे व भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश भेगडे यांच्या संकल्पनेतून पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील देवगाव (खु) येथे पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप करण्यात आला. धाराशिव जिल्हात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव व पशु यांचे…

अधिक बातमी वाचा...

स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा पूरग्रस्तांच्या दुःखांना मोठं समजणारा संवेदनशील मनाचा अधिकारी- मा.मैनक घोष

धाराशिव (तानाजी घोडके) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मैनक घोष यांचे वडील कैलासवासी माणिकराव घोष यांचे आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांना सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव या ठिकाणी तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले परंतु आजारपणामुळे वडिलांचे दुःखद निधन झाले. घोष  हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी…

अधिक बातमी वाचा...

भाजपा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची SSC/HSC परिक्षा शुल्क माफ करण्याची विनंती.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्ह्यात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढ्यांना महापूर येवून सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरयांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. तसेच महापूराने नदी, नाले व ओढ्या काठच्या जमिनी खरडून जाऊन अतोनात…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्तांसाठी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सरसवली आहे तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिली आहे.परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक दानशूर मदतीला पुढे येत आहेत…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उपजिल्हा रुग्णालय परंडा

परंडा:- राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे महिलांना विविध प्रकारच्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उपजिल्हा रुग्णालय परंडा च्या वतीने महिलांच्या स्तनाचे कर्करोग,…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!