परंडा शहरात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांची मोठी उपस्थिती..

परंडा : माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच महात्मा फुले चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक समतेचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. या कार्यक्रमाला जनशक्ती नगर विकास…

अधिक बातमी वाचा...

परंडा एस.टी. आगारात सवलत कार्ड वाटपात गोंधळ : एजन्सी प्रतिनिधी गैरहजर, नागरिकांचा संताप

परंडा, दि. १२ (माझं गांव माझं शहर) : परंडा येथील एस.टी. आगारात नागरिकांसाठी सवलत कार्ड वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्यामुळे अनेक वयोवृद्ध, महिला व दिव्यांग नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. सवलत कार्ड मिळवण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी एस.टी….

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे भाजपा कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

परंडा,दि.११(माझं गांव माझं शहर) :- महिला शिक्षण आणि समानतेच्या अधिकारासाठी आयुष्यभर लढणारे सामाजिक क्रांती आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक सत्तार…

अधिक बातमी वाचा...

नवनीत फाउंडेशनकडून बावची विद्यालयाच्या शिक्षकांचा सन्मान

परंडा : दि. ११(माझं गांव माझं शहर) नवनीत फाउंडेशनच्या वतीने बावची विद्यालयातील NMMS स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नवनीत फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. घुगे साहेब प्रमुख उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी NMMS स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. प्रमोद डोके सर…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपालिकेकडून दिव्यांगांसाठी ५% निधीचे वाटप; ₹३,७४,४०० रुपयांचा लाभ

परंडा (प्रतिनिधी) : परंडा नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या ५% निधीतून एकूण ₹३,७४,४०० रुपयांचे वाटप शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना करण्यात आले. मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली व नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध गरजा लक्षात घेऊन हा निधी वितरित करण्यात आला असून, यामध्ये सहाय्यक साहित्य, उपजीविकेसाठी आवश्यक साधने तसेच…

अधिक बातमी वाचा...

मुगांव येथे शालेय शिक्षण समितीची बिनविरोध निवड

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा मुगांव येथे शालेय शिक्षण समितीची निवडणूक नुकतीच शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे या समितीची निवड बिनविरोध करण्यात आली असून ग्रामस्थांनी एकमताने पदाधिकाऱ्यांवर विश्वास दर्शवला आहे. या निवड प्रक्रियेत समितीच्या अध्यक्षपदी प्राणजीत नवनाथ गवंडी यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी ज्योती अमोल पाटील यांची…

अधिक बातमी वाचा...

बावची येथील ऑट्रॉसिटी प्रकरण : आरोपी रामचंद्र थिटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

परंडा (प्रतिनिधी): तालुक्यातील बावची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आरोपीच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, परंडा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नेमके प्रकरण काय?दुधी शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेताशेजारी आरोपीची जमीन आहे. २६ मार्च…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘वंचित बहुजन आघाडी ’चे चूल मांडून आंदोलन

धाराशिव,दि.६(माझं गांव माझं शहर) धाराशिव येथे गॅस तुटवडा व दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चूल मांडून आंदोलन करण्यात आले.राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांविषयी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.‘नरेंद्र,कब मिलेगा सिलेंडर’ या घोषणांद्वारे आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. गॅस टंचाईमुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड…

अधिक बातमी वाचा...

पांढरेवाडी ग्रामस्थांचा संताप : मूलभूत सुविधांशिवाय पाणीपट्टी वसुलीला विरोध.

परंडा दि.६ (प्रतिनिधी) निम्न खैरी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पांढरेवाडी गावाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झाले असले, तरी पांढरेवाडी (पश्चिम) गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने जलसंपदा विभागाकडे निवेदन देत तात्काळ उपाय -योजनांची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पांढरेवाडी (पश्चिम) येथे रस्ते, पूल, आरोग्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात ‘भाजपा स्थापना दिवस’ उत्साहात साजरा..

परंडा, दि.६(माझं गांव माझं शहर) ६ एप्रिल १९८० रोजी ‘भारतीय जनता पार्टी’ नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी “राष्ट्र प्रथम” मानून ‘लक्ष्य अंत्योदय’, ‘प्रण अंत्योदय’, ‘पथ अंत्योदय’ या ध्येयाने आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. आज भारतीय जनता…

अधिक बातमी वाचा...

संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश : अक्षय सुरेश डोके यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रतिनिधी,दि २(माझं गांव माझं शहर)संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कंडारी गावचे सुपुत्र अक्षय सुरेश डोके यांनीमिश्रित इलेक्ट्रोलाईट्ससह बोरोसिलीकेट ग्लास वर इलेक्ट्रो केमीकल डिस्चार्ज मशिनिंग (ECDM ) चे गणितीय मॉडेलिंग आणि प्रायोगिक तपासणी या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगास चालना मिळणार आहे . ही संशोधन पदवी त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे…

अधिक बातमी वाचा...

परंडा : वंचित बहुजन आघाडीची संयुक्त जयंती उत्सव समिती स्थापन.

परंडा (प्रतिनिधी) – परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ निमित्त जयंती उत्सव समिती गठनासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास जाधव, उपाध्यक्षपदी नवनाथ गावडे तर सचिवपदी किरण बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!