टाकळी यमाई देवी मंदिरात दरोडा; दानपेटी चोरी, पोलिसांकडून तपास सुरू

परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील टाकळी येथिल प्रसिद्ध यमाई देवी मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने धाडसी दरोडा घालत दानपेटी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११, १२ व १३ मे रोजी यमाई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली…

अधिक बातमी वाचा...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

परंडा, माझं गांव माझं शहर (दि :१४ एप्रिल) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.१४ एप्रिल रोजी पहाटे १२:०५ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के तसेच फुले-आंबेडकर विद्वतसभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, सोमवारी बेमुदत सामूहिक रजेचा इशारा .

परंडा (प्रतिनिधी) : अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी जात असताना परंडा येथील तहसीलदार यांच्यावर कार्यालयाच्या आवारातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी परंडा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि. १६) दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, १५…

अधिक बातमी वाचा...

श्री हंसराज स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त परंड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

परंडा, दि. 16 (माझं गांव माझं शहर): श्री हंसराज स्वामी महाराज यांच्या 171 व्या पुण्यतिथीनिमित्त परंडा येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुण्यतिथी उत्सव दि. 22 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दि. 22 एप्रिल रोजी श्रीराम महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार असून,…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवमध्ये दिव्यांग शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंतीत; कारवाई कुठे? निराशेतून आत्मदहनाचा इशारा..

धाराशिव,दि १५(माझं गांव माझं शहर) : दिव्यांग शेतकरी विठ्ठल गायकवाड यांचे स्वतःचे मौजे बामणी ता जि धाराशिव येथे गट नं ०२ मध्ये ३१ आर क्षेत्र आहे यांना गेल्या तीन वर्षांपासून स्वतःच्या शेतात वहिवाट करण्यास अडथळे निर्माण होत असून, यामुळे त्यांची शेती पडीक राहिली आहे. पोटापाण्याचा मुख्य आधार असलेली शेती बंद पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ…

अधिक बातमी वाचा...

भैरुबाच्या नावानं चांगभलं च्या घोषात लाखो भाविकांनी घेतले रथाचे दर्शन .

परंडा-सोनारी, दि १५(माझं गांव माझं शहर) अखंड महाराष्ट्रासह अंध्रा व कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ रथोत्सव काल मोठ्या उत्साहात पार पडला . कंडारीच्या कावड व पालखीचे १ च्या सुमारास मंदीर परिसरात अगमन झाले . देवास पाण्याची धार घालण्यात आली . दुपारी २ वाजता श्रीकाळभैरवनाथाची महाआरती करण्यात आली . त्यानंतर मुख्य रथ…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष ; आर.बी. ग्रुप व नालंदा समूहाकडून फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात..!

परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : परंडा शहरासह संपूर्ण तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. आर.बी. ग्रुप व नालंदा समूहाच्या वतीने माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदनेने…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परंडा शहर व ग्रामीणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डी.बी.ए. समूहाच्या वतीने परंडा येथील आठवडा बाजार चौकात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन मा. नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, माजी उपनगराध्यक्ष मतीन जिनेरी, खय्युम तुटके, दीपक गायकवाड, महेश कसबे, नासिर सय्यद, महेश थोरबोले, अभिमान सुतार, डॉ. नागेश डाके, धर्मराज नरोटे,…

अधिक बातमी वाचा...

प्रमाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात ; दिव्यांग उद्योग समूहाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

परंडा (प्रतिनिधी) :प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक प्रशासन, शिस्तबद्ध कामकाज आणि जनहिताचे निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. अशा अधिकाऱ्यांची…

अधिक बातमी वाचा...

अधिकारी,कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या महिला ग्रामपंचायत अधिकारी यांची चौकशी करून प्रशासकीय करवाई करा.

परंडा दि.१३ (माझं गांव माझं शहर) :परंडा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गैरवर्तन व अनियमित कारभाराच्या तक्रारी समोर आल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी संघटना डी एनई१३६ शाखा परंडा यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आसुन सदर निवेदनात म्हटले आहे की संबंधित महिला…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात विना परवानगी उभारलेले पुतळे सन्मानपूर्वक काढा : प्रशासनाचे आवाहन

माझं गाव माझं शहर | परंडा प्रतिनिधी :- परंडा शहरात शासनाची परवानगी न घेता उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सन्मानपूर्वक काढावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंडा येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तसेच तहसीलदार काकडे यांनी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!