नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जनशक्ती आघाडीच्या पाणी पुरवठा सभापतींवर जोरदार टीका ;परंडा शहर पाणी प्रश्न पेटला !
परंडा, दि.५(तानाजी घोडके) परंडा शहरात गेल्या सहा दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जनशक्ती आघाडीच्या पाणी पुरवठा सभापतींवर जोरदार टीका करत, “काम जमत नसेल तर तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडीच्या कारभारावर सडकून टीका…
