परंडा : माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच महात्मा फुले चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक समतेचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाला जनशक्ती नगर विकास आघाडीचे नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील, उपनगराध्यक्ष समरजित सुजितसिंह ठाकूर, पाणी पुरवठा सभापती रमेशसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम सभापती राहूल बनसोडे, गटनेते अनिल शिंदे यांच्यासह नगरसेवक इस्माईल कुरैशी, अब्बास मुजावर, अविनाश विधाते, मजहर दहेलूस, सत्तार पठाण, सोमनाथ अलबत्ते, आकिब पठाण, माजी नगराध्यक्ष नसिर शहाबर्फीवाले, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच तानाजी बनसोडे, नदुकुमार शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, दयानंदन बनसोडे, धनंजय सोनटक्के, किरण बनसोडे, मोहन बनसोडे, विलास जाधव, भारत घोगरे गुरुजी, शिवाजी बनसोडे, किरण सोनवणे, राहूल कुलकर्णी, जुल्फेकार काझी, सुरज बनसोडे, प्रितम डाके, राहूल पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.