परंडा (माझं गांव माझं शहर) येथील जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, परंडा येथे मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी श्री विटकर महादेव यांच्या हस्ते लाल फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी मेळाव्यास प्रोत्साहन म्हणून पाचशे रुपयांचे बक्षीस दिले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. मुजावर आमिनाबी अबरार उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या बागवान तब्बसुम, शाहबर्फीवाले गजाला, शाहबर्फीवाले फरहिन यांची उपस्थिती लाभली. याशिवाय डोके बी एच साधन व्यक्ती, श्री गवळे बबन (केंद्रप्रमुख, तांदूळवाडी), श्री इंगळे रामचंद्र (मु. अ. प्रशाला, परंडा), श्री पवार दिनकर (कन्या प्रशाला, परंडा), श्रीमती सय्यद यास्मिन (मु. अ. उर्दू प्रा. शा., परंडा), प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांच्यासह अनेक शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री खतीब ए. ए. यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बांगी जे. एम., श्रीमती समीना , श्री लोधवाल व सौ अंजली चंदनशिवे (शिंदे), आमरीन बाजी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढविल्याबद्दल आयोजकांतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.