परंडा(तानाजी घोडके)तालुक्यातील करंजा गावचे शेतकरी पुत्र उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटेफळ येथे जिल्हा परिषद शाळेसाठी शनिवारी (२६ जुलै) रोजी साऊंड सिस्टिम सप्रेम भेट देण्यात आली.
उद्योजक रामभाऊ पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी करण्याचा संकल्प घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त शुभचिंतकांनी अभिष्टचिंतन करताना फेटा, पुष्पहार, यासाठी वायफट खर्च न करता भेट स्वरूपात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणारे शालेय साहित्य आणण्याचे आवाहन केले होते.
या भेट स्वरूप शैक्षणिक शालेय साहित्याचे अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. याच अनुशंगातुन वाटेफळ येथील जिल्हा परिषद शाळेस साऊंड सिस्टिमची आवश्यकता असल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली. यावेळी त्यांनी तत्काळ त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते वाटेफळ येथील शाळेस नवीन साऊंड सिस्टिम मुख्याध्यापक यांच्याकडे भेट स्वरूपात दिली. उद्योजक रामभाऊ पवार यांच्या उदारतेचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या या कार्याबद्दल वाटेफळ जि. प. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी आभार मानले.